मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. 2022 च्या जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकात भारताचा क्रमांक काय आहे?
A. 39
B. 45
C. 52
D. 68
2022 मध्ये वेगवेगळ्या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक:
- जागतिक आनंद अहवाल 2022 – 136
- प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 – 54
- आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 – 43
- लैंगिक तफावत अहवाल 2022 – 135
- ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 – 40
- असमानता निर्देशांक – 123
- ग्लोबल हंगर निर्देशांक – 107
- ग्लोबल पेन्शन निर्देशांक 2022 – 41
- फ्रीडम हाऊस इंटरनेट फ्रीडम इंडेक्स – 51
- कायद्याचे नियम निर्देशांक 2022 – 77
- नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2022 – 61
- ग्लोबल एव्हिएशन सुरक्षितता रँकिंग – 48
- पासपोर्ट इंडेक्स 2022 – 87
- जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022- 68
2. कोणत्या राज्यात सेला पास बोगदा स्थित आहे?
A. आंध्रप्रदेश
B. आसा
C. अरुणाचल प्रदेश
D. गुजरात
- सेला पास बोगदा, 13,000 फूट उंचीवर
- अरुणाचल प्रदेशातील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वार बांधला जात आहे.
- हे सर्व हवामान परिस्थितीत भारतीय सैन्याला चीन सीमेजवळील तवांगजवळील वास्तविक नियंत्रण रेषेपर्यंत (LAC-Line of Actual Control) प्रवेश देईल.

अरुणाचल प्रदेश माहिती
- स्थापना – 20 फेब्रुवारी 1987
- मुख्यमंत्री – प्रेमा खांडू
- राज्यपाल – बी.डी. मिश्रा
- राजधानी – इटानगर
- राष्ट्रीय उद्यान : मौलिंग, नामदाफा
- महत्वाची धरणे: रंगनाडी, सुबानसिरी
- महत्वाचे नृत्य : वाचो, पोनुंग, बुईया, चलो
3. कोणतं राज्याने अलीकडेच ओरुनोडोई 2.0 योजना लाँच केली आहे?
A. मध्यप्रदेश
B. आसाम
C. तमिळनाडू
D. राजस्थान
ज्या अंतर्गत 10.54 लाख लाभार्थ्यांना दर महिन्याला 1,250 रुपये दिले जातील
आसाम राज्याची माहिती
- स्थापना – 1947
- मुख्यमंत्री – हिमंता बिस्वा सरमा
- राज्यपाल – जगदीश मुखी
- राजधानी – दिसपूर
- राष्ट्रीय उद्यान- 7: मानस, रायमोना, देहींग पटाई, काझिरंगा, डिब्रू – सैखोवा
- महत्वाची धरणे : पग्लडिया, सुबानसिरी
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात “गृहप्रवेश” कार्यक्रम सुरू केलेला आहे?
A. आगरतळा
B. नागपूर
C. हैदराबाद
D. बेंगलोर
दोन लाखांहून अधिक गरीब कुटुंबे त्यांच्या नवीन घरात प्रवेश करत आहेत.
5. ‘Rytu Bandhu’ ही भारतीय राज्य संघाची प्रमुख योजना आहे?
A. तमिळनाडू
B. महाराष्ट्र
C. आंध्रप्रदेश
D. तेलंगणा
वर्षातून दोन पिकांसाठी शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीला पाठिंबा देण्यासाठी हा कल्याणकारी कार्यक्रम आहे.
तेलंगणा राज्याची माहिती
- स्थापना – 02 जून 2014
- मुख्यमंत्री – के चंद्रशेखर राव
- राज्यपाल – तमिलीसाई सौंदाराजन
- राजधानी – हैदराबाद
- राष्ट्रीय उद्यान – मृगावाणी, महावीर हरिना
- महत्वाचे धरणे : सिंगूर, पोचरम
6. गती शक्ती विद्यापीठचे पहिले कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. अनुराग ठाकूर
B. पियुष गोयल
C. अश्विनी वैष्णव
D. नितीन गडकरी
15 ऑगस्ट 2021 रोजी 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री गति शक्ती योजना जाहीर केली होती.
7. कोणत्या राज्याच्या ‘दुआरे सरकार’ योजनाने केंद्राचा डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 जिंकला आहे?
A. आसाम
B. पश्चिम बंगाल
C. तमिळनाडू
D. राजस्थान
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पुरस्कार दिला
पश्चिम बंगाल राज्याची माहिती
- स्थापना – 1947
- मुख्यमंत्री – ममता बॅनर्जी
- राज्यपाल – सी व्ही आनंदा बोस
- राजधानी – कोलकाता
- राष्ट्रीय उद्यान: सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा
- महत्वाची धरणे : फरक्का, दुर्गापूर, कागसबाटी
8. G20 समिट अंतर्गत कार्यक्रम कोणत्या भारतीय शहराला अर्बन-20 चे अध्यक्षपद मिळाले आहे?
A. अहमदाबाद
B. पुणे
C. हैदराबाद
D. नाशिक
- G-20-Group of Twenty
- स्थापना – 26 सप्टेंबर 1999
- अध्यक्ष – नरेंद्र मोदी 2023 – भारत
- उद्देश : जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र आणणे.
9. बेट्टा कुरुवा समाजाचा ST श्रेणी मध्ये समावेश करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर हा समाज कोणत्या राज्यातील आहे?
A. आंध्रप्रदेश
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. कर्नाटक
कर्नाटक राज्याची माहिती
- स्थापना -01 नोव्हेंबर 1956
- मुख्यमंत्री – बसवराज बोम्माई
- राज्यपाल – थावरचंद गेहलोत
- राजधानी – बँगलोर
- राष्ट्रीय उद्यान: बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी, बॅनरघट्टा
- महत्वाची धरणे : तुंग भद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णा राजा, नारायणपूर
10. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने कोणत्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह वंगण {lubricant} घरोघरी पोहोचवण्यासाठी भागीदारी केली आहे ?
A .FuelDost
B. ReadyFue
C. FuelBuddy
D. यापैकी नाही
11. वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये भारताचे जागतिक स्थान 2010 मध्ये 7व्या क्रमांकावरून 2020 मध्ये 1 पर्यंत सुधारले आहे?
A. 2
B. 3
C. 5
D. 1
12. कोलकाता येथेईस्टर्न झोनल कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आहे?
A. अमित शाह
B. नितीन गडकरी
C. एन चंद्रशेखरन
D. अमिताभ कांत
13. गोवा मुक्ती दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
A. 17 डिसेंबर
B. 18 डिसेंबर
C. 19 डिसेंबर
D. 20 डिसेंबर
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.