29 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 29 December 2022 Current Affairs in Marathi

29 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 29 December 2022 Current Affairs in Marathi

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. सुशासन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर: 25 डिसेंबर

2. खालीलपैकी कोणत्या आयआयटी ने कृत्रिम हृदय विकसित केले आहे जे तीव्र हृदय समस्या असलेल्या लोकांना मदतशीर ठरणार आहे?

उत्तर: आयआयटी कानपूर

2. रेल्वे कोणत्या उपक्रम अंतर्गत 1 हजार लहान परंतु महत्वाच्या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा विचार करत आहे?

उत्तर: अमृत भारत स्टेशन योजना

3. पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: नेपाळ

अलीकडील काही महत्वाची राष्ट्रे आणि त्यांचे पंतप्रधान

 • फ्रान्स – एलिजाबेथ बोर्न
 • जपान – फ्यूमिओ किशिदा
 • पाकिस्तान – शेहबाज शरीफ
 • कझाकिस्तान – अलिहान स्मायलोव्ह
 • युके – ऋषी सुणक
 • इस्त्राईल – बेंजामिन नेतण्याहू
 • ऑस्ट्रेलिया – अँथोनी अल्बानिज
 • रशिया – मिखाईल मिशुस्टिन
 • युक्रेन – शमीहल देनिज
 • अफगाणिस्तान – हसन अखुंद
 • इटली – जॉर्जिया मेलोनि
 • सौदी अरेबिया – मोहंमद बिन सलमान
 • स्वीडन – उलफ क्रिस्टरसन
 • डेन्मार्क – मेटे फ्रेडरिकसन
 • आयर्लंड – लिओ वराडकर
 • नेपाळ – पुष्पकमल दाहल

4. साहित्य अकादमी पुरस्कार 2022 मराठी भाषेसाठी कोणाला पुरस्कार भेटलेला आहे?

उत्तर: प्रवीण दशरथ बांदेकर

साहित्य अकादमी पुरस्कार 2022

 • एकूण 22 भाषांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 • आसामी – भुल सत्य (लघुकथा) – मनोजकुमार गोस्वामी
 • इंग्रजी – All the Lives we never lived (कादंबरी) – अनुराधा रॉय
 • हिंदी – तुमडी के शब्द (कविता) – बद्रि नारायण
 • कोकणी – अमृतवेल (कादंबरी) – माया अनिल खरांगते
 • मराठी – उजव्या सोंडेच्या बाहुल्या (कादंबरी) – प्रवीण दशरथ बांदेकर
 • तमिळ – काला पानी (कादंबरी) – एम राजेंद्रन

5. खालीलपैकी कोणी खेलो इंडिया चा नवीन Dashboard लाँच केला आहे?

उत्तर: अनुराग ठाकूर

 • अनुराग ठाकूर यांनी केलेले उद्घाटन
 • नवी दिल्ली येथे FIH हॉकी विश्वचषक 2023 चे ट्रॉफीचे अनावरण
 • हिमाचल प्रदेश मध्ये वॉटर स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन
 • WADA अथलित बायोलोजिकल पासपोर्ट सिम्पोजियम शुभारंभ
 • 75 क्रिएटिव्ह माईंड साठी 53 तास चॅलेंज चे उद्घाटन
 • नवी दिल्ली येथे एशिया पॅसिफिक broadcasting युनियन असेम्ब्ली चे उद्घाटन
 • भारतातील पहिल्या ड्रॉन प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन
 • Khelo India चा नवीन dashboard लाँच केला
 • कर्नाटक मधील MG स्टेडियम येथील क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन केले.

6. श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या 75 व्या अमृत महोत्सवाला कोणी संबोधित केले?

उत्तर: नरेंद्र मोदी

7. बिजू स्वास्थ्य कल्याण योजना (BSKY) कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

उत्तर: ओडिसा

 • सुरुवात – 15 ऑगस्ट 2018
 • या योजनेद्वारे तुम्हाला प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य स्वरूपात दिले जातील. केवळ बिपियल श्रेणीतील नागरिक यासाठी अर्ज करू शकतात

ओडिसा राज्या विषयी माहिती

 • स्थापना – 1 एप्रिल 1936
 • मुख्यमंत्री – नवीन पटनायक
 • राज्यपाल – गणेशी लाल
 • राजधानी – भुवनेश्वर

8. सॅमसंग इले्ट्रॉनिक्स ने कोणत्या देशात 220 दशलक्ष संशोधन आणि विकास केंद्र उघडले आहे?

उत्तर: व्हिएतनाम

9. आंतरराष्ट्रीय साथीच्या तयारीचा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर: 27 डिसेंबर

10. कुआलालम्पुर, मलेशिया येथे टॉप एरिना ज्युनियर इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतपद कोणी जिंकले आहे?

उत्तर: गेतो सोरा

क्रीडा स्पर्धा आणि विजयी संघ

 • फिफा अंडर 17 महिला विश्वचषक 2022 – स्पेन
 • सय्यद मुश्ताक अली करंडक 2022 – मुंबई
 • आशियाई स्कवोष चॅम्पियनशिप 2022 – पुरुष – भारत
 • राष्ट्रीय क्रिकेट कर्णबधिर टी 20 चॅम्पियनशिप 2022- हरियाणा
 • डेव्हिड कप टेनिस 2022 – कॅनडा
 • विजय हजारे ट्रॉफी 2022 – सौराष्ट्र
 • टेनिस प्रीमियर लीग 2022 – हैदराबाद स्ट्रायकर
 • अंधांना टी 20 विश्वचषक – भारत
 • 2022 फिफा विश्वचषक – अर्जेंटिना
 • International Hockey Federation नेशन्स कप 2022 – भारतीय महिला हॉकी संघ

11. माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन यांना लाचखोरी आणि मनी लाऊंड्रिंग मध्ये दोषी आढलल्यानंतर 11 वर्षे तुरुंगवास शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते?

उत्तर: मालदीव (इब्राहिम मोहम्मद सोलिह)

मालदीव विषयी माहिती

 • अध्यक्ष – इब्राहिम एम सोलीह
 • राजधानी – माले
 • चलन – मालदीव्हियन रुपया

12. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील बँकांना विद्यमान लॉकर ग्राहकांशी त्यांचे लॉकर करार कोणत्या तारखेपासून नूतनीकरण करण्याचे बंधनकारक केले आहे?

उत्तर: 1 जानेवारी 2023

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment