30 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 30 December 2022 Current Affairs in Marathi
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. कोणत्या 2 देशांदरम्यान पहिला हवाई सराव वीर गार्डीयान 23 आयोजित केले जाणार आहे?
उत्तर: भारत आणि जपान
स्थळ – जपान मधील हायकुरी हवाई तळ आणि इरूमा हवाई तळ येथे हा सराव होणार आहे.
2. सरकारने सशस्त्र दलासाठी किती प्रलय बलेस्टिक क्षेपणास्त्रे चीनच्या आणि पाकिस्तानच्या सीमेच्या बाजूने तैनात करण्यासाठी मंजुरी दिली आहे?
उत्तर: 120
3. केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धरतीवर लोकायुक्त कायदा आणणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
उत्तर: महाराष्ट्र
लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याविषयी माहिती
- राज्याच्या लोकायुक्त चा यापूर्वीचा कायदा हा सण 1971 रोजीचा आहे.
- आताच्या आणि आधीच्या कायद्यात महत्वाचा फरक हा आहे की त्या कायद्याच्या अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम समाविष्ट नव्हता.
- त्यामुळे विशेष प्रकरण म्हणून चौकशी करता यायची.मात्र आता हा कायदा देखील लोकायुक्त मध्ये आला आहे. यापूर्वीच्या कायद्यात मंत्री अथवा मुख्यमंत्री यांचा समावेश नव्हता.
- एखाद्या मंत्र्यावर तक्रार झाली, तर ते विशेष प्रकरण म्हणून पडताळणी करण्याबाबत राज्यपाल सांगू शकत होते. यात केवळ शिफारस करण्याचे अधिकार होते. मात्र आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याला लोकायुक्तच्या कक्षेत आणले आहे.
- या कायद्यामुळे आता मुख्यमंत्री , मंत्री आणि लोकप्रतिनिधी यानांही लोकायुक्तच्या अंतर्गत आणले आहे.
- एखादी भ्रष्टाचारी घटना घडल्यास आता लोकायुक्त त्यावर थेट कारवाई करू शकणार आहेत.
4. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: अनिल कुमार लाहोटी
भारतीय रेल्वे विषयी माहिती
- रेल्वे स्थापना – 16 एप्रिल 1853
- बोर्डची स्थापना – मार्च 1905
- रेल्वे मंत्री – अश्विनी वैष्णव
- रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष – अनिल कुमार लाहोटी (चौथे अध्यक्ष)
- मुख्य कार्यकारी अधिकारी – अनिल कुमार लाहोटी
- संपूर्ण झोन – 19
- मुख्यालय – नवी दिल्ली
5. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर: संतोष कुमार यादव
अलीकडील काही नवीन नियुक्त्या
- 50 वे CJI – डी वाय चंदरचुड
- BCCI चे अध्यक्ष – रॉजर बिन्नी
- 16 वे एटरणी जनरल – आर व्यंकटरमनी
- रेल्वे बोर्ड MD आणि CEO – अनिल कुमार लाहोटी
- CBSE अध्यक्षा – निधी चिब्बर
- 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
- उपनिवडणुक आयुक्त – अजय भादू
- NHAI अध्यक्ष – संतोष कुमार यादव
- 15 व्या राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मू
- 14 वे उपराष्ट्रपती – जगडीप धणखर
- 27 वें CGA – भारती दास
- नीती आयोग उपाध्यक्ष – सुमन बेरी
- नीती आयोग CEO – परमेश्वरन अय्यर
- ISRO – एस सोमनाथ
- DRDO – डॉ समोर V कामथ
- ICC उपाध्यक्ष – इम्रान ख्वाजा
6. 2022 चा 30 वा एकलव्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
उत्तर: स्वस्ति सिंग
स्वस्ति सिंग या सायकलिंग खेळाशी संबंधित आहेत.
मागील काही काळातील महत्वाचे पुरस्कार आणि विजेते
- गांधी मंडेला पुरस्कार 2022 – दलाई लामा
- फ्रेंच सरकारचा शेवेलीयर पुरस्कार – अरुणा साईराम
- बेली के आशफोर्ड पदक 2022 – पहिले भारतीय शास्त्रज्ञ डॉ सुभाष बाबू
- डॉ अब्दुल कलाम सेवा पुरस्कार – रवी कुमार सागर
- रिस्पॉन्सइबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड – केरळ टुरिझम
- कुवेंपु राष्ट्रीय पुरस्कार 2022 – व्ही अण्णामलाई
- हित्य अकादमी पुरस्कार 2022 – अनुराधा रॉय आणि बद्रि नारायण
- द इमिसरी ऑफ पीस पुरस्कार – श्री श्री रविशंकर
- प्रथम रोहिणी नय्यर पुरस्कार – सेत्रीचेम संगतम
- रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2021-22 – सुदीप सेन आणि शोभना कुमार
- मिसेस वर्ल्ड 2022 – सरगम कौशल
- 30 वां एकलव्य पुरस्कार – स्वस्ति सिंग
7. कोणती कंपनी राजस्थानच्या बिकानेर मध्ये amplus सोलारसाठी 121 मेगावॉट चां सोलर प्लांट बांधणार आहे?
उत्तर: जॅक्सन ग्रुप
8. धर्मदाम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ आहे. ते कोणत्या राज्यात आहे?
केरळ
भारतातील घडलेल्या प्रथम घटना
- पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालय – त्रिपुरा
- भारतातील पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन पटवाई, रामपूर उत्तर प्रदेश
- भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव – मोढेरा
- कोणत्या राज्यात पहिला अक्वा पार्क उभारला जाणार आहे – अरुणाचल प्रदेश
- ईशान्येकडील पहिला मासा संग्रहालय कोणत्या राज्यात – अरुणाचल प्रदेश
- जगातील पहिले वैदिक घड्याळ – उज्जैन मध्ये
- सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य – केरळ
- आशियाई कप स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला – मनिका बत्रा
- Karate 1 series A – सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय – प्रणय शर्मा
- स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापना करणारे पहिले देशातील राज्य – महाराष्ट्र
- दीव्यांग कलाकारांसाठी पहिला दिव्य कला मेळा – दिल्ली
9. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा भव्य पुतळा कोणत्या शहरात बसवला जाणार आहे?
उत्तर: ग्वाल्हेर, मध्यप्रदेश
- 25 डिसेंबर 2022 – 98 वी जयंती होती.
- 1924 मध्ये त्यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला होता.

10. गंगा खोऱ्यात सिवरेज पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी केंद्राने किती कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे?
उत्तर: 2700
11. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण द्वारे कोणत्या तुरुंगात Eat Right Campus टॅग देण्यात आला आहे?
उत्तर: बुलंदशहर कारागृह
- उत्तर प्रदेशात फारुखाबाद कारागृह नंतर हा दुसरा कारागृह आहे ज्याला Eat Right Campus टॅग मिळतो आहे.
12. वर्ष 2022 साठी बीबीसी स्पोर्ट्स पर्सनलिटी ऑफ द इयर कोणाला भेटला आहे?
उत्तर: बेथ मिड (इंग्लंड)
13. पहिल्या के आर गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्कार 2022 साठी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर: अलेडा ग्वेरा
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.