जानेवारी 2023 चालू घडामोडी | January 2023 Current Affairs in Marathi

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

10 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 10 January 2023 Current Affairs in Marathi 

10 January 2023 Current Affairs in Marathi 
10 January 2023 Current Affairs in Marathi

 

1. जगातील सर्वात लांब नदी क्रुझ चे नाव काय आहे?

उत्तर: गंगा विलास

 • जगातील सर्वात मोठी लांब लक्झरी रिव्हर क्रुझ
 • क्रुझ 50 दिवसात 3,200 किलोमिटर अंतर कापेल
 • उत्तर प्रदेशातील वाराणसी ते आसाम मधील दिबृगड
 • 27 वेगवेगळ्या नदी प्रणालीचा समावेश आहे
 • 50 हून अधिक पर्यटन स्थळांवर थांबेल
 • ज्यात जागतिक वारसा स्थळांचा देखील समावेश आहे.

2. भारत कोणत्या देशाला जागतिक स्तरावर मागे टाकून तिसरे सर्वात मोठे ऑटो मार्केट बनला आहे?

उत्तर: जपान

जगातील सर्वात मोठे 3 रे ऑटो मार्केट – भारत

 1. मेनलंड चायना
 2. युनायटेड स्टेट्स
 3. भारत
 4. जपान
 5. जर्मनी
 • मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे
 • भारताची नवीन वाहनांची एकूण विक्री सुमारे 4.25 दशलक्ष युनिट्स इतकी होती.
 • चीन – 26.17 दशलक्ष वहाने विकली
 • अमेरिका – 15.4 दशलक्ष वहाने विकली

3. कोणाच्या द्वारे Y20 समिट ची थीम, लोगो आणि वेबसाईट नवी दिल्ली मध्ये लाँच केली आहे?

उत्तर: अनुराग ठाकूर

 • Y20 समिट इंडिया
 • Youth 20 (Y20) ha G 20 हा अधिकृत युवा सहभाग गट आहे.
 • हे G 20 च्या प्राधान्य क्रमांवर एक व्यासपीठ प्रदान करते जे तरुणांना त्यांची दृष्टी आणि कल्पना व्यक्त करण्यास अनुमती देते.
 • भारत प्रथमच Y 20 शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे

4. पृथ्वीचा परिभ्रमण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर: 8 जानेवारी

5. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

उत्तर: गोवा

भारतातील काही विमानतळ आणि त्यांचे ठिकाण

 • नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ – कोलकाता, वेस्ट बंगाल
 • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ – हैद्राबाद, तेलंगणा
 • श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ – अमृतसर पंजाब
 • जय प्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ – पटना, बिहार
 • उय्यलवादा नरसिंहा रेड्डी विमानतळ – ऑर्वकल, कुर्णुल, आंध्रप्रदेश
 • लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ – गुवाहाटी, आसाम
 • रुप्सी विमानतळ – आसाम
 • स्वामी विवेकानंद विमानतळ – नया रायपूर, छत्तीसगड
 • बिर्सा मुंडा विमानतळ – रांची, झारखंड

6. कोणते जिल्हा न्यायालय हे कामकाजाची ई – प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय ठरले आहे?

उत्तर: उस्मानाबाद

7. 26 वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला आहे?

उत्तर: कर्नाटक (12 जानेवारी ते 16 जानेवारी)

8. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राज्याच्या विविध भागात जातीचे सर्वेक्षण सुरू केले आहे?

उत्तर: बिहार

9. तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी तमिळनाडू मधील कोणत्या शहरात ऑक्टेव्ह 2023 उत्सवाचे उद्घाटन केले आहे?

उत्तर: तंजावर

महत्वाचे उत्सव आणि ठिकाण

 • गान नगाई उत्सव, शिरुइ लिली महोत्सव, सांगाई महोत्सव – मणिपूर
 • लव्हेनडर उत्सव, हेरथ महोत्सव – जम्मू आणि काश्मीर
 • भारतातील सर्वात मोठा ड्रोन महोत्सव – नवी दिल्ली
 • सरहुल महोत्सव – झारखंड
 • गनगौर महोत्सव – राजस्थान
 • ईगास महोत्सव – उत्तराखंड
 • उगादी महोत्सव – आंध्रप्रदेश
 • खारची महोत्सव – त्रिपुरा
 • मदाई महोत्सव – छत्तीसगड
 • मेघा कायक फेस्टीव्हल – मेघालय

10. व्हॉईस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट चे आयोजन कोणता देश करणार आहे?

उत्तर: भारत

या शिखर परिषदेसाठी 120 हून अधिक देशांना आमंत्रित करण्यात आले आहे.

11. सानिया मिर्झाने ____ व्यावसायिक क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली?

उत्तर: टेनिस

 • फेब्रुवारी 2023 मध्ये दुबईत होणाऱ्या WTA स्पर्धेत ती निवृत्त होणार आहे
 • Women’s Tennis Association
 • महिला टेनिस संघटना
 • WTA एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

12. 2023 आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था किती टक्के वाढेल अशी अपेक्षा आहे?

उत्तर: 7 टक्के

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार

13. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने 25 जानेवारी आणि 9 फेब्रुवारी दरम्यान किती रुपयांचे सार्वभौम ग्रीन बाँड जारी करणार आहे?

उत्तर: 8000


9 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 9 January 2023 Current Affairs in Marathi 

9 January 2023 Current Affairs in Marathi
9 January 2023 Current Affairs in Marathi

1. संविधान पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

उत्तर: राजस्थान

 • संविधान उद्यान – जयपूर
 • द्रौपदी मर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

2. जगातील पहिले पाम लिफ हस्तलिखित संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू झालेले आहे?

उत्तर: केरळ

केरळ राज्याविषयी माहिती

 • स्थापना – 1 नोव्हेंबर 1956
 • मुख्यमंत्री – पिणाराय वीजयन
 • राज्यपाल – आरिफ मोहम्मद खान
 • राजधानी – तिरुवनंतपुरम

3. भारताचा 79 वा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे?

उत्तर: प्रणेष एम

लेटेस्ट ग्रँड मास्टर

 • 79 – प्रणेश एम , तमिळनाडू
 • 78 – कौस्तव चॅटर्जी , पश्चिम बंगाल
 • 77 – आदित्य मित्तल, महाराष्ट्र
 • 76 – प्रणव आनंद, कर्नाटक
 • 75 – प्रणव व्हि, तमिळनाडू
 • 74 – राहुल श्रीवास्तव, तेलंगणा
 • 73 – भरत सुब्रमण्यम, तमिळनाडू
 • 72 – संकल्प गुप्ता, महाराष्ट्र
 • 71 – मित्रभा गुहा, पश्चिम बंगाल
 • 70 – राजा रित्विक, तेलंगणा

4. खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश 31 जानेवारी रोजी पहिली G 20 बैठकीचे आयोजन करणार आहे?

उत्तर: पुद्दुचेरी

5. दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

उत्तर: 9 जानेवारी

 • 17 वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन
 • प्रमुख पाहुणे म्हणून गयानाचे अध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली
 • 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
 • 2003 मध्ये सुरू झाला आहे.
 • हा उत्सव कार्यक्रम भारतातील प्रमुख निवडक शहरात दरवर्षी 7 ते 9 जानेवारी दरम्यान आयोजित केला जातो.
 • प्रवासी भारतीय केंद्राचे नवीन नाव सुषमा स्वराज भवन असे आहे.

6. तीन दिवसीय ईशान्य कृषी कुंभ 2023 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे?

उत्तर: मेघालय

 • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उद्घाटन केले
 • मेघालय राज्याविषयी माहिती
 • स्थापना – 21 जानेवारी 1972
 • मुख्यमंत्री – कोनार्ड संगमा
 • राज्यपाल – बी डी मिश्रा
 • राजधानी – शिलाँग

7. भारतातील 3693 केंद्रीय संरक्षित स्मारकांपैकी किती स्मारके बेपत्ता झाले आहेत?

उत्तर: 50

8. मध्यप्रदेश च्या राज्यपालांच्या हस्ते ह्युमन अनाटॉमी चे प्रकाशन केले आहे. हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

उत्तर: एके द्विवेदी

महत्वाचे पुस्तक आणि त्यांचे लेखक

 • आशियाचे आण्विकिकरण – फ्रेंच लेखक रेने नाबा (Nuclearization of Asia)
 • द लास्ट हिरोज – पी साईनाथ
 • लता: सुर गाथा (इंग्रजी) – इरा पांडे
 • लता: अ लाईफ इन म्युझिक (हिंदी) – यतिंद्र मिश्रा
 • आंबेडकर : एक जीवन – शशी थरूर
 • A Confused Mind Story – साहिल सेठ
 • The Philosophy of Modern Song – बॉब डिलन
 • Rajinis Mantras: Life Lesson from India’s most loved Superstar – पी सी बाल सुब्रमण्यम

9. अलीकडेच कोणत्या देशाने मधमाश्या साठी जगातील पहिली लस मंजूर केली आहे?

उत्तर: अमेरिका

जे अमेरिकन फोलब्रुड रोगापासून संरक्षण प्रदान करेल

10. जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत?

उत्तर: सय्यम मेहरा

11. जानेवारी 2023 मध्ये आयोजित केलेल्या कोलकाता पुस्तक मेळ्याचा THEME देश कोणता आहे?

उत्तर: स्पेन

कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याची ही 46 वी आवृत्ती आहे.

12. कोणत्या सरकारने महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर: उत्तराखंड

उत्तराखंड राज्या विषयी माहिती

 • स्थापना – 9 नोव्हेंबर 2000
 • मुख्यमंत्री – पुष्कर सिंह धामी
 • राज्यपाल – गुरमित सिंह
 • राजधानी – देहरादून

13. अपोलो 7 crew चे शेवटचे जिवंत सदस्य कोण होते, ज्यांचे आता काही काळापूर्वी निधन झाले आहे?

उत्तर: वॉल्टर कनिंगहम


8 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 8 January 2023 Current Affairs in Marathi 

8 January 2023

1. बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात स्थित आहे?

उत्तर: ओडिसा

मेन्स हॉकी वर्ल्ड कप -2023

2. सरकारी शाळांमध्ये शिकत असलेल्या 750 शालेय मुलींनी बनलेला Space Kidz India उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे?

उत्तर: ISRO

 • ISRO – इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनाझेशन (भारतीय अंतराळ संशोधन संस्था)
 • संस्थापक – विक्रम साराभाई
 • स्थापना – 15 ऑगस्ट 1969
 • मुख्यालय – बेंगळुरू
 • अध्यक्ष – एस सोमनाथ

3. महाराष्ट्र राज्यात कोणत्या पोलिसांना बेस्ट पोलीस युनिट पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर: जालना आणि नागपूर

काही मुख्य पुरस्कार

 • डॉ अब्दुल कलाम सेवा पुरस्कार – रवी कुमार सागर
 • रिस्पॉनसिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड – केरळ टुरिझम
 • कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2022 – व्हि अन्नामलाई
 • साहित्य अकादमी पुरस्कार 2022 – अनुराधा रॉय आणि बद्रि नारायण
 • द एमिसरी ऑफ पीस पुरस्कार – श्री श्री रविशंकर
 • प्रथम रोहिणी नय्यर पुरस्कार – सेत्रिचेम संगतम
 • रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2021-22 – सुदीप सेन आणि शोभना कुमार
 • मिसेस वर्ल्ड 2022 – सरगम कौशल
 • 30 वा एकलव्य पुरस्कार – स्वस्ति सिंग
 • बीबीसी स्पोर्ट्स पर्सनलिटी ऑफ द ईअर 2022 – बेथ मिड
 • बीबीसी इंडीयन स्पोर्ट्स वूमन ऑफ ईअर 2022 – मीराबाई चानू
 • अटल सन्मान पुरस्कार – प्रभू चंद्र मिश्रा
 • महाराष्ट्र राज्यात सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट पुरस्कार – जालना आणि नागपूर पोलीस

4. मार्च ____ मध्ये G 20 परराष्ट्र मंत्र्यांची दिल्लीत बैठक होणार आहे?

उत्तर: 2023

 • प्रगती मैदान , नवी दिल्ली येथे
 • विशेष आमंत्रित अतिथी देश : बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि यूएई
 • भारताचे G 20 शेर्पा – अमिताभ कांत
 • G 20 विषयी माहिती
 • ग्रुप ऑफ ट्वेंटी
 • स्थापना + 26 स्पटेंबर 1999
 • अध्यक्ष – नरेंद्र मोदी 2023 – भारत
 • G 20 शेर्पा – अमिताभ कांत
 • उद्देश – जागतिक अर्थव्यस्थेतील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महत्वपूर्ण औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र आणणे

5. राष्ट्रीय महिला बुद्धिबळ शीर्षक राखणारी सर्वात तरुण खेळाडू कोण ठरली आहे?

उत्तर: दिव्या देशमुख

6. कोणत्या राज्य सरकारने सहा यूएई आधारित कंपन्यांसोबत ग्लोबल इन्वेस्तर्स समिट पूर्वी रू 18,590 कोटींचा सामंजस्य करार केला आहे?

उत्तर: उत्तर प्रदेश

7. खालीलपैकी कोणत्या बँकेने 2023 मध्ये मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी केली आहे?

उत्तर: HDFC बँक

डिजिटल परिवर्तनासाठी ही भागीदारी आहे

HDFC बँकेविषयी माहिती

 • स्थापना – ऑगस्ट 1994
 • संस्थापक – हसंमुख भाई पारख
 • अध्यक्ष – अतनु चक्रवर्ती
 • सीईओ – शशिधर जगदिषन
 • मुख्यालय – मुंबई
 • टॅग लाईन – we understand your world

8. FSSAI द्वारे कोणत्या स्टेशनला 5 स्टार रेटिंग सह इट राईट स्टेशन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे?

उत्तर: वाराणसी कॅट रेल्वे स्टेशन

FSSAI विषयी माहिती

 • Food Safety and Standards Authority of India
 • भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण
 • स्थापना – ऑगस्ट 2011
 • अध्यक्ष – राजेश भूषण
 • सीईओ – एस गोपाळ कृष्णन
 • क्षेत्र – अन्न
 • मुख्यालय – नवी दिल्ली
 • चेअरमन – रिटा तेओतिया

9. परीक्षा पे चर्चा ची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे?

उत्तर: सहावी

परीक्षा पे चर्चा

परीक्षा आणि शाळेनंतर चे जीवन, संबंधित चिंतांवर चर्चा करण्यासाठी शिक्षक आणि पालक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणणारा परस्पर संवादी कार्यक्रम
27 जानेवारी नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियम वर परीक्षा पे चर्चा ची पहिली आवृत्ती 2018 मध्ये आली होती

10. राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर: 5 जानेवारी

11. अमित शाह यांच्या हस्ते कोणत्या राज्यात केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची पायाभरणी करण्यात आलेली आहे?

उत्तर: कर्नाटक

12. भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सेवा कोणत्या नदी खाली असणार आहे?

उत्तर: हुबळी

 • ईस्ट वेस्ट मेट्रो कॉरिडॉर प्रोजेक्ट
 • डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे

13. टाटा सन्स चे माजी संचालक ____ यांचे 84 व्या वर्षी निधन झाले आहे

उत्तर: कृष्ण कुमार


7 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 7 January 2023 Current Affairs in Marathi 

7 January 2023 Current Affairs in Marathi 
7 January 2023 Current Affairs in Marathi

1. कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींना 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे?

उत्तर: मालदीव

 • भ्रष्टाचार आणि मनी लॉड्रिंग प्रकरणी दोषी आढलल्यानंतर त्यांना ११ वर्षाचा तुरुंगवास व $5 दशलक्ष दंड ठोठावला गेला आहे.
 • मालदीवचे अध्यक्ष – इब्राहिम मोहम्मद सोलीह
 • मालदीवचे राजधानी – माले
 • चलन – मालदिवियन रुफिया

2. भारताने केव्हा पर्यंत देशातून काळा- अजार नष्ट करण्यासाठी वचनबध्द केले आहे?

उत्तर:2023

भारताच्या काही वचनबद्धता

 • 2022 – शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
 • 2022 – वाघांची संख्या दुप्पट
 • 2023 – भारतीय रेल्वेने ब्रोडगेज मार्गांचे विद्युतीकरण केले
 • 2022 – ट्रान्स फॅट फ्री स्थिती निर्माण करणे
 • 2021-22 – भारतीय रेल्वेने 1000 मेगावॉट सौर ऊर्जेची योजना आखली
 • 2022 – भारतीय अक्षय ऊर्जा 175 GW स्थापना
 • 2030 – भारताने 500 GW अक्षय ऊर्जा योजना आखली आहे
 • 2023-24 – भारताने एक अब्ज टन कोळशाचे उत्पादन केले
 • 2024 – शेतीमध्ये डिझेलची जागा घेण्यासाठी अक्षय ऊर्जेचा वापर
 • 2024 – भारताचे रस्ते अपघात 50% कमी करण्याचे उद्दिष्ट्ये
 • 2024 – भारतीय रेल्वेचे 100% विद्युतीकरण
 • 2024 – सर्व नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे
 • 2025 – पेट्रोल मध्ये 20% इथेनॉल मिश्रण
 • 2023 – देशातून काळा – अजार नष्ट करणे

3. कोणत्या राज्य सरकारने ‘दिदिर सुरक्षा कवच’ आणि ‘दिदीर दुत’ हे दोन उपक्रम सुरू केले?

उत्तर: पश्चिम बंगाल

4. केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला किती कोटी रुपये च्या प्रारंभिक परिव्यायसह मान्यता दिली आहे?

उत्तर: 19,744 कोटी

National green hydrogen mission – राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन

उद्देश

 • भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचे, वापरण्याचे आणि निर्यात करण्याचे जागतिक केंद्र बनविणे
 • 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करून हवामान बदलाचे लक्ष
 • 2030 पर्यंत प्रतिवर्षी 5 दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची क्षमता प्राप्त करणे
 • 2030 पर्यंत 125 GW अक्षय ऊर्जेची क्षमता वाढवणे
 • 2030 पर्यंत वार्षिक 50 दशलक्ष मेट्रिक टन प्रति कार्बन डायॉक्साईड उत्सर्जन कमी करणे
 • 2030 पर्यंत 1 लाख कोटी रुपयांच्या जीवाश्म इंधनाच्या आयातीतील घट करणे
 • या क्षेत्रात 8 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी
 • 2030 पर्यंत या क्षेत्राला 6 लाखांहून अधिक रोजगार निर्मितीचे लक्ष

5. पाण्यावरील पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्र्यांची परिषद कोणत्या ठिकाणी झाली आहे?

उत्तर: भोपाळ

थीम – वॉटर व्हिजन @ 2047

6. आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर: तपन सैकिया

आसाम राज्य नागरी पुरस्कार 3 श्रेणीत दिला जातो

 • आसाम वैभव – पहिला सर्वोच्च – 01
 • आसाम सौरव – दुसरा सर्वोच्च – 05
 • आसाम गौरव – तिसरा सर्वोच्च – 15

आसाम मधील इतर काही पुरस्कार

 • आसाम व्हॅली साहित्य पुरस्कार 1990
 • 1990 – भाबेंद्र नाथ सैकीया
 • 2017 – सनंता टेंटी, येशे दोरजी ठोंगची, डॉ रिटा चौधरी
 • आसाम रत्न 2009
 • 2009 – डॉ भूपेन हजारिका – कला क्षेत्रात
 • 2010 – डॉ ममोनी रायसोम गोस्वामी – साहित्य क्षेत्रात
 • 2015 – डॉ जितेंद्र नाथ गोस्वामी
 • आसाम वैभव 2021
 • 2021 – रतन टाटा – समाज सेवा
 • 2022 – डॉ तपन सैकीया – वैद्यकीय सेवा

7. पाच वेळा आमदार राहिलेले कुलदीप सिंग पठानिया कोणत्या विधानसभेचे पुढील संभापती होणार आहेत?

उत्तर: हिमाचल प्रदेश

8. आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि संख्यिकी महासंघ द्वारे 2022 साठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे?

उत्तर: लिओनेल मेस्सी

9. JAGA मिशन साठी वर्ल्ड हेबीटेट अवॉर्ड 2023 कोणत्या राज्याने जिंकला आहे?

उत्तर: ओडिसा

 • मे 2018 मध्ये JAGA मिशन लाँच केले
 • हा जगातील सर्वात मोठा झोपडपट्टी शीर्षक आणि सुधारणा उपक्रम आहे
 • 2023 च्या अखेरीस ओडिशा हे झोपडपट्टी मुक्त होणारे भारतातील पहिले राज्य बनविण्याचा उद्दिष्ट्य आहे.

10. जागतिक युद्ध अनाथ दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर: 6 जानेवारी

 • World War Orphans Day
 • उत्तर: थीम – युद्धग्रस्त मुलांसाठी उभे राहणे

11. बंधन बँकेने आपले जहा बंधन वहा ट्रस्ट मोहीम लाँच केली आहे, या मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहे?

उत्तर: सौरव गांगुली

बंधन बँक विषयी माहिती

 • स्थापना – 2001
 • संस्थापक – चंद्रशेखर घोष
 • मुख्यालय – कोलकाता
 • MD आणि CEO – चंद्रशेखर घोष
 • अध्यक्ष – अनुप कुमार सिन्हा

12. तामिळनाडू चा एम प्रणेश हा भारताचा नवीनतम आणि कितवा ग्रँड मास्टर ठरला आहे?

उत्तर: 79

13. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड ने तांत्रिक सहकार्यासाठी कोणत्या आयआयटी सोबत करार केला आहे?

उत्तर: आयआयटी (आय एस एम ) , धनबाद


6 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 6 January 2023 Current Affairs in Marathi 

6 January 2023 Current Affairs in Marathi 
6 January 2023 Current Affairs in Marathi

 

1. PM नरेंद्र मोदी हे 13 जानेवारी रोजी वाराणसी ते ____ दरम्यान जगातील सर्वात लांब नदी क्रुझ सेवा लाँच करणार आहे?

ऊत्तर: आसाम

2. जयपूर, राजस्थान येथील राजभवन येथील संविधान उद्यानाचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले आहे?

ऊत्तर: द्रौपदी मर्मु

3. कोणते सरकार राज्य अन्न सुरक्षा अंतर्गत एका वर्षासाठी मोफत तांदूळ देणार आहे?

ऊत्तर: ओडिसा

लाभार्थ्यांना एक वर्षासाठी दरमहा मोफत 5 किलो तांदूळ राज्य अन्न सुरक्ष योजनेअंतर्गत

ओडिसा राज्या विषयी माहिती

 • स्थापना – 1 एप्रिल 1936
 • मुख्यमंत्री – नवीन पटनायक
 • राज्यपाल – गणेशी लाल
 • राजधानी – भुवनेश्वर

4. महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो?

ऊत्तर: 6 जानेवारी

 • दिवंगत पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ
 • दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले.
 • बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणूनही ओळखले जाते.

5. कोणते राज्य RTI उत्तरदायित्व मध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारे राज्य ठरले आहे?

ऊत्तर: तमिळनाडू

माहिती अधिकार कायदा 2021-22 अंतर्गत आरटीआय
मागितलेल्या माहितीपैकी 23% माहिती सामायिक करत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता

तमिळनाडू राज्या विषयी माहिती

 • स्थापना – 26 जानेवारी 1950
 • मुख्यमंत्री – एम के स्टॅलिन
 • राज्यपाल – आर एन रवी
 • राजधानी – चेन्नई

6. भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारणार आहे?

ऊत्तर: महाराष्ट्र

7. कोणत्या देशात 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांसाठी युरोपियन युनियन परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?

ऊत्तर: स्वीडन

8. कोणत्या राज्यात (Gaan-Ngai)गान नगाई उत्सव साजरा करण्यात आलेला आहे?

ऊत्तर: मणिपूर

महत्वाचे उत्सव आणि ठिकाणं

 • ज्योतिर्गमय महोत्सव , ईशान मंथन महोत्सव – नवी दिल्ली
 • आंबा महोत्सव – ब्रुसेल्स, बेल्जियम
 • सितल षष्ठी महोत्सव, नुखाई जुहार – ओडिशा
 • उरुका महोत्सव , बैखो महोत्सव – आसाम
 • गान नगाई उत्सव, शिरुई लिली महोत्सव, संगाई महोत्सव – मणिपूर
 • लव्हेएनडर उत्सव, हेरथ महोत्सव – जम्मू आणि काश्मीर
 • भारतातील सर्वात मोठा ड्रोन महोत्सव – नवी दिल्ली
 • Sarhul महोत्सव – झारखंड
 • गणगौर महोत्सव – राजस्थान
 • इगास महोत्सव – उत्तराखंड
 • उगादी महोत्सव – आंध्रप्रदेश

9. Ambedkar: A Life हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे?

ऊत्तर: शशी थरूर

10. भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना देण्यासाठी भारताने कोणासोबत कर्ज करार केला आहे?

ऊत्तर: ADB

महाराष्ट्र मध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 350 दशलक्ष युएस डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यात आली

 • आशियाई विकास बँक (एडीबी) – Asian Development Bank
 • अध्यक्ष – मात्सुगु असकावा
 • मुख्यालय – मांड लुआंग, फिलिपिन्स
 • स्थापना – 19 डिसेंबर 1966
 • सदस्यत्व – 68 देश

11. भारत पे ने कोणाची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे?

ऊत्तर: नलिन नेगी

12. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री निवासी जमीन हक्क योजना सुरू केली आहे?

ऊत्तर: मध्य प्रदेश

13. अलीकडेच कोणत्या देशाने युरो हे चलन म्हणून स्वीकारले आहे?

ऊत्तर: क्रोएशिया


5 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 5 January 2023 Current Affairs in Marathi 

5 January 2023 Current Affairs in Marathi 
5 January 2023 Current Affairs in Marathi

1. कोणत्या देशाचे महान फुटबॉल पटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले?

उत्तर: ब्राझील

2. हायड्रोजन समर्थित ट्रेन लाँच करणारा ____ हा आशिया खंडातील पहिला आणि जगातील दुसरा देश ठरला आहे?

उत्तर: चीन

 • जर्मनी ने सप्टेंबर 2022 मध्ये पहिली हायड्रोजन समर्थित ट्रेन चालू केली होती.

3. सियाचीन मध्ये तैनात किंवा कार्यरत होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?

उत्तर: कॅप्टन शिवा चव्हाण

 • सियाचीन हिमनदी काराकोरम पर्वतरांगेत आहे.

4. भारत सरकारने परदेशी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारासाठी किती जणांची निवड केली आहे?

उत्तर: 27

 • राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.
 • मध्य प्रदेशातील इंदोर येथे प्रवासी भारतीय दिवसाचे 17 वे अधिवेशन आहे.
 • 27 परदेशी भारतीयांना यावर्षी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळणार आहे.
 • गयाना चे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली हे यावर्षी प्रमुख पाहुणे असतील.
 • 2023 theme: Diaspora: Reliable Partners for India’s Progress in Amrit Kaal
 • प्रवासी भारतीय दिवस – Pravasi Bhartiya Diwas
 • पहिल्यांदा – 2003
 • भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाद्वारे साजरा करण्यात येतो.

5. निवडणूक आयोगाने मैथिली ठाकूर यांची कोणत्या राज्याची राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे?

उत्तर: बिहार

mailthali thakur
Mailthali Thakur
 • निवडणूक प्रक्रियेत सहभागासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणार आहे
 • तिचा जन्म बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात झाला.
 • ती भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताची प्रशिक्षित आहे.
 • Election Commission of India (भारतीय निवडणूक आयोग)
 • स्थापना – 25 जानेवारी 1950
 • मतदार दिवस – 25 जानेवारी
 • मुख्यालय – नवी दिल्ली
 • कलम 324 अनुसार स्थापना
 • मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
 • उपनिवडनुक आयुक्त – अजय भादु
 • निवडणूक आयुक्त – अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल
 • प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त – सुकुमार सेन
 • प्रथम महिला निवडणूक आयुक्त – व्हि एस रमादेवी

6. दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

उत्तर: 4 जानेवारी

Louis braille
Louis braille
 • ब्रेल प्रणाली प्रथम 1829 मध्ये प्रकाशित झाली
 • ब्रेलचा शोध लावणारे लुई ब्रेल यांच्या जन्माच्या स्मरणार्थ

7. मे 2023 महिन्यापर्यंत 100% सीवरेज सुविधा असलेले भारतातील पहिले शहर कोणते शहर बनणार आहे?

उत्तर: हैद्राबाद

 • पहिला आले प्रक्रिया कारखाना – मेघालय
 • उत्तर भारतातील पहिले डेटा सेंटर – उत्तर प्रदेश
 • सोलर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ – कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
 • हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तयार करणे पहिले राज्य – तमिळनाडू
 • स्वतंत्र भारतातील पहिला मतदार – श्याम सरण नेगी (१०६) हिमाचल प्रदेश
 • पहिला ग्रीनफिल्ड फार्म मशिनरी प्लांट – पिथमपुर, मध्यप्रदेश
 • म्युनिसिपल बाँड जारी करणारे भारतातील पहिले शहर – पुणे (dusre- वडोदरा)
 • भारतातील पहिले खाजगीरीत्या तयार केलेले रॉकेट – विक्रम एस – आंध्र प्रदेश
 • पहिले सोन्याचे एटीएम – हैद्राबाद
 • पहिले कार्बन न्युट्राल फार्म – केरळ
 • भारतातील पहिला ग्रीन स्टील प्लांट – कल्याणी फेस्टा

8. खालीलपैकी कोणती कंपनी उपकंपणी द्वारे सानंद मधील फोर्ड इंडिया च्यां उत्पादन प्रकल्पाचे अधिग्रहण पूर्ण करेल?

उत्तर: टाटा मोटर्स लिमिटेड

9. आयुर्वेदातील संशोधन आणि विकास करण्यासाठी भारत सरकारने SMART कार्यक्रम सुरू केला आहे, SMART मध्ये S चा अर्थ काय?

उत्तर: Scope

 • SMART – Scope For Mainstreaming Ayurveda Research in Teaching Professionals

10. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) कोणत्या राज्यात मिशन 929 लाँच केले आहे?

उत्तर: त्रिपुरा

 • यामध्ये 929 मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
 • त्रिपुरा राज्याविषयी माहिती
 • स्थापना – 21 जानेवारी 1972
 • मुख्यमंत्री – माणिक शाहा
 • राज्यपाल – सत्यदेव नारायण आर्य
 • राजधानी – अगरतला

11. कॉफी बोर्ड ऑफ इंडिया च्या म्हणण्यानुसार 2022 मध्ये भारतात एकूण कॉफीची निर्यात किती टक्क्यांनी वाढून 4 लाख टन झाले?

उत्तर: 1.66 टक्के

12. भारतातील खालीलपैकी कोणत्या देशाशी स्थलांतर आणि गतिशीलता बाबतीत करार केला आहे?

उत्तर: ऑस्ट्रिया

 • अध्यक्ष – अलेक्झांडर व्हान डर बेलेन(Alexander Van der Bellen)
 • राजधानी – जिनिव्हा
 • चलन – युरो

13. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्टील आर्क ब्रीज सियोमचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले?

उत्तर: अरुणाचल प्रदेश

 • 100 मीटर, सियोम ब्रीज
 • अरुणाचल प्रदेश मधील सियांग जिल्हा
 • या पुलामुळे भारत चीन सिमेकडे जाणारा पर्यायी मार्ग खुला होणार आहे.

4 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 4 January 2023 Current Affairs in Marathi 

 

4 January 2023 Current Affairs in Marathi 
4 January 2023 Current Affairs in Marathi

1. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आपला 65 वा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला आहे?

उत्तर: 1 जानेवारी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)

 • स्थापना – 1958
 • मुख्यालय – नवी दिल्ली
 • अध्यक्ष – डॉ समीर व्हि कामथ
 • जबाबदार मंत्रालय – संरक्षण मंत्रालय

2. देशातील 78 वे ग्रँडमास्टर कोण ठरले आहे?

उत्तर: कौस्तव चॅटर्जी, पश्चिम बंगाल

3. भारताची 7 वी वंदे भारत एक्स्प्रेस कोणत्या ठिकाणा दरम्यान सुरू झाली आहे?

उत्तर: हावडा ते न्यू जलपाईगुडी

 • वंदे भारत – ट्रेन 18
 • पहिली – दिल्ली ते वाराणसी
 • दुसरी – दिल्ली ते कटरा (वैष्णवदेवी)
 • तिसरी – गांधीनगर ते मुंबई
 • चौथी – दिल्ली ते हिमाचल प्रदेश
 • पाचवी – चेन्नई ते मैसूर
 • सहावी – बिलासपूर ते नागपूर
 • सातवी – हावडा ते जल पाईगुडी

4. देशभरामध्ये प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांची संख्या कितीवरती पोहचली आहे?

उत्तर: 9000

 • योजनेचे नाव – प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना
 • सुरुवात – 2008
 • नाव बदल – 2016
 • उद्दिष्ट्ये – जेनरिक औषधे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे

5. डिसेंबर 2022 मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल जमा झाला तो किती आहे?

उत्तर: 1 लाख 49 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त

 • मागच्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये जमा झालेला GST महसुलाच्या तुलनेत हे प्रमाण 15 टक्के जास्त आहे.

6. पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रितीयानो रोनाल्डो कोणत्या देशाचा क्लब अल नासर यात 2025 पर्यंत सामील झाला आहे?

उत्तर: सौदी अरेबिया

7. भारतातील बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये ____ पर्यंत वाढला आहे, मागील 16 महिन्यातील हा सर्वोच्च आहे?

उत्तर: 8.3%

8. कोणत्या राज्यातील धर्मादम हे भारतातील पहिले पूर्ण ग्रंथालय मतदार संघ बनले आहे?

उत्तर: केरळ

केरळ राज्याविषयी माहिती

 • स्थापना – 1 नोव्हेंबर 1956
 • मुख्यमंत्री – पिनाराय विजयन
 • राज्यपाल – आरिफ मोहंमद खान
 • राजधानी – तिरुवनंतपुरम

9. आयसीसी पुरुष टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी कोणाला नामांकित करण्यात आले आहे?

उत्तर: सूर्यकुमार यादव

10. पंतप्रधान नरेंद्र मोदी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसला (ISC) कोणत्या शहरात संबोधित केले आहे?

उत्तर: नागपूर

11. डिसेंबर 2022 मध्ये UPI व्यवहारात किती कोटींची वाढ झाली आहे?

उत्तर: 782 कोटी

12. 2022 मध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू म्हणून उदयास आला आहे?

उत्तर: विराट कोहली

 • जाहिरातीद्वारे विराटने 256.52 कोटी रुपये कमावले

13. 2023 हे वर्ष जगभरात _____ चे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले जात आहे?

उत्तर: Millets (बाजरी)


2 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 2 January 2023 Current Affairs in Marathi 

 

2 January 2023 Current Affairs in Marathi
2 January 2023 Current Affairs in Marathi

1. लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यासाठी देशातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले ठरले आहे?

उत्तर: महाराष्ट्र

2. प्रती कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्न निर्देशांक मध्ये अव्वल स्थानी कोणते राज्य आले आहे?

उत्तर: मेघालय

Average Monthly Income per Agricultural Household

 • मेघालय राज्य – 29,248 रुपये
 • पंजाब – 26,701 रुपये
 • हरियाणा
 • अरुणाचल प्रदेश
 • जम्मू काश्मीर – 18,918 रुपये

महत्वाचे निर्देशांक आणि भारताचा क्रमांक

 • आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 – 43
 • लैंगिक तफावत अहवाल 2022 – 135
 • ग्लोबल इन्वेंशन इंडेक्स 2022 – 40
 • असमानता निर्देशांक – 123
 • ग्लोबल हंगर निर्देशांक – 107
 • ग्लोबल पेन्शन निर्देशांक 2022 – 41
 • फ्रीडम हाऊस इंटरनेट फ्रीडम इंडेक्स – 51
 • कायद्याचे नियम निर्देशांक 2022 – 77
 • नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2022 – 61
 • ग्लोबल एव्हिएशन सुरक्षितता निर्देशांक – 48
 • पासपोर्ट इंडेक्स 2022- 87
 • जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 – 68

3. जागतिक कुटुंब दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

उत्तर: 1 जानेवारी

जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस

 • 1 जानेवारी – जागतिक कुटुंब दिवस
 • 3 जानेवारी – सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिवस)
 • 4 जानेवारी – जागतिक ब्रेल दिवस
 • 6 जानेवारी – बाळशास्त्री जांभेकर जन्मदिन (पत्रकार दिवस)
 • 9 जानेवारी – प्रवासी भारतीय दिवस
 • 12 जानेवारी – राष्ट्रीय युवा दिन (स्वामी विवेकानंद जयंती)
 • 15 जानेवारी – भारतीय सैन्य दिन
 • 23 जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
 • 24 जानेवारी – राष्ट्रीय बालिका दिन
 • 25 जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिवस, राष्ट्रीय पर्यटन दिवस
 • 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिवस (७४ वा), आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस
 • 28 जानेवारी – लाला लजपतराय यांची जयंती

4. पृथ्वीपासून 392.01 प्रकाश वर्षे दूर स्थित आणि सूर्याच्या सर्वात जवळच्या ताराला भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांचे नाव देण्यात आले आहे?

उत्तर: अटलबिहारी वाजपेयी

5. राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोण अव्वल ठरले आहे?

उत्तर: रेल्वे संघ

6. कोणाच्या हस्ते सीमा सुरक्षेचे प्रहरी ॲप लाँच करण्यात आले आहे?

उत्तर: अमित शहा

7. कोळसा मंत्र्यांनी ____ राज्यामध्ये 300 कोटी रुपयांच्या अंगुल – बलराम रेल्वे लाईनचे उद्घाटन केले?

उत्तर: ओडिसा

8. केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: प्रवीण कुमार श्रीवास्तव

9. कोणत्या देशामध्ये ब्रेन इटिंग अमिबा शी संबंधित पहिला मृत्यू झालेला आहे?

दक्षिण कोरिया

10. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) महासंचालकाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे?

उत्तर: सुजॉय लाल थाओसेन

 • सुजॉय यांनी सीआरपीएफ मध्ये 37 वे संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे.

BSF विषयी माहिती

 •  BSF – बॉर्डर सिक्युरिटी फोर्स
 •  सीमा सुरक्षा दल
 •  स्थापना – 1 डिसेंबर 1965
 •  महासंचालक (डीजी) – सुजॉय लाल थाओसेन
 •  बोधवाक्य – आजीवन कर्तव्य
 •  मुख्यालय – नवी दिल्ली

11. जागतिक ब्लिटझ चॅम्पियनशिप 2022 मध्ये 02 पदक जिंकणारे इतिहास मधील पहिले खेळाडू कोण बनले आहेत?

उत्तर: कोनेरु हंपी

12. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ___ येथे मेगा डेअरी चे उद्घाटन केले आहे.

उत्तर: कर्नाटक

कर्नाटक राज्याविषयी माहिती

 •  स्थापना – 1 नोव्हेंबर 1956
 •  मुख्यमंत्री – बसवराज बॉम्माई
 •  राज्यपाल – थावरचंद गेहलोत
 •  राजधानी – बेंगळुरू

13. JIO ने अलीकडेच कोणत्या राज्यात 5G सेवा सुरू केली आहे?

आंध्रप्रदेश


1 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 1 January 2023 Current Affairs in Marathi

 

1 January 2023 Current Affairs in Marathi
1 January 2023 Current Affairs in Marathi

1. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने डान्स टू डे-कार्बोनाईज हा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला आहे?

उत्तर: पेट्रोलियम मंत्रालय

2. भारतातील भाषा विविधता मॅप करण्यासाठी गुगल ने अर्थसहाय्य केलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव काय आहे?

उत्तर: प्रोजेक्ट वाणी

3. कोणत्या ठिकाणी सैन्याने सैनिकांसाठी प्रथम 3D प्रिंटेड घरे सुपूर्द केली आहे?

उत्तर: अहमदाबाद

 • स्वस्त आहेत
 • बनविण्यासाठी वेळ कमी लागेल
 • लष्करी अभियांत्रिकी सेवांनी बांधले

4. पंतप्रधान मोदींनी _____ च्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस ला हावडा न्यू जलपाईगुडी मार्ग येथे हिरवा झेंडा दाखवला?

उत्तर: पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल राज्याविषयी माहिती

 • स्थापना – 1947
 • मुख्यमंत्री – ममता बॅनर्जी
 • राज्यपाल – सी व्ही आनंदा बोस
 • राजधानी – कोलकाता

5. 25.14 कोटी रुपये खर्चून कोणत्या राज्यातील पशुसंवर्धन साठी भारतातील पहिला निलगिरी तहर प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे?

उत्तर: तमिळनाडू

तमिळनाडू राज्या विषयी माहिती

 • स्थापना – 26 जानेवारी 1950
 • मुख्यमंत्री – एम के स्टॅलिन
 • राज्यपाल – आर एन रवी
 • राजधानी – चेन्नई

6. कोणत्या राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णांना चांगली उपचार सुविधा मिळावी यासाठी ई – सुश्रुत रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली सुरू केली आहे?

उत्तर: उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश राज्याविषयी माहिती

 • स्थापना – 24 जानेवारी 1950
 • मुख्यमंत्री – योगी आदित्यनाथ
 • राज्यपाल – आनंदीबेन पटेल
 • राजधानी – लखनऊ

7. केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या राज्यात दोन ठिकाणांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे?

उत्तर: उत्तरप्रदेश

 • गोरखपुर जिल्हा – मुंदेरा बाजार – चौरी चौरा
 • देवरिया जिल्हा – तेलिया अफगाण – तेलिया शुल्का

8. खालीलपैकी वर्ष 2022 च्या आयसीसी उदयोन्मुख पुरुष खेळाडू क्रिकेटर पुरस्कार साठी कोणाचे नाव नामनिर्देशक करण्यात आले आहे?

उत्तर: अर्षदिप सिंग

ICC विषयी माहिती

 • स्थापना – 15 जून 1909
 • अध्यक्ष – ग्रेग बार्कले
 • उपाध्यक्ष – इम्रान ख्वाजा
 • सीईओ – ज्योफ अलार्डिस
 • महाव्यवस्थापक – वसीम खान
 • मुख्यालय – दुबई (यूएई)

9. कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक सहाय्य योजना रयथू बंधूचा 10 वा टप्पा सुरू केला आहे?

उत्तर: तेलंगणा

तेलंगणा राज्याविषयी माहिती

 • स्थापना – 2 जून 2014
 • मुख्यमंत्री – के चंद्रशेखर राव
 • राज्यपाल – तमिलीसाई सौंदाराजन
 • राजधानी – हैद्राबाद

10. बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्त्राईल चे पंतप्रधान म्हणून किती वेळेस शपथ घेतली आहे?

उत्तर: 6 वेळा

बेंजामिन नेतन्याहू
बेंजामिन नेतन्याहू
 • इस्त्राईल चे 9 वे पंतप्रधान
 • सर्वाधिक काळ काम करणारे इस्त्राईल चे पंतप्रधान
 • 1996 ते 1999
 • 2009 ते 2021
 • 1988 मध्ये उप परराष्ट्र मंत्री देखील होते

11. केंद्रीय मंत्री मंडळाने खालीलपैकी कोणत्या देशामध्ये नवीन वाणिज्य दूतावास उघडण्यासाठी मंजुरी दिली आहे?

उत्तर: मालदीव आणि लिथुआनिया

12. कोणत्या देशाने अनिवार्य लष्करी सेवेत 4 महिने ते 1 वर्ष वाढविण्याची घोषणा केली आहे?

उत्तर: तैवान

13. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?

उत्तर: 100 व्यां वर्षी

 

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment